About Us, Climate Week India

आमच्याविषयी

क्लायमेट वीक इंडिया हे हवामान कृतीसाठीचे देशव्यापी, समुदायाचे व्यासपीठ आहे. हे कोणत्याही एका व्यक्तीचे नाही—हे सर्वांनी मिळून घडवले आहे. समान मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम उभा आहे.

सामुदायिक करार’ ही या उपक्रमाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यावर आधारित उद्दिष्टे ठरवली गेली आहेत. एकत्र काम करताना आपण एकमेकांशी कसे वागावे हे ‘आचारसंहिता’ स्पष्ट करते. या मूल्यांशी सहमत असलेली कोणतीही संस्था किंवा व्यक्ती या उपक्रमाचा भाग होऊ शकते. सामुदायिक करार (कम्युनिटी अग्रीमेंट्स) उद्दिष्टे आचारसंहिता

हा संपूर्ण प्रवास कसा आकाराला आला, हे तुम्ही आमच्या ब्लॉगवर वाचू शकता. आमच्या ब्लॉगवर

सामुदायिक करार (कम्युनिटी अग्रीमेंट्स)

ही मार्गदर्शक तत्त्वे ११ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या ‘क्लायमेट वीक पार्टनर्स’च्या बैठकीत सामुदायिक करार पद्धतीने तयार करण्यात आली. या तत्त्वांमध्ये सर्व सहयोगी एकत्रितपणे आणखी सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात.

क्लायमेट वीक इंडिया’चे सहयोगी म्हणून आम्ही सर्वजण सामूहिकपणे मान्य करतो की…

प्रत्येक करार खाली सोप्या भाषेत दिला आहे. समुदायाने ज्या मूळ शब्दांत यावर सहमती दर्शवली होती, ते वाचण्यासाठी कोणत्याही करारासमोरील बाणावर क्लिक करा.

  1. आम्ही सर्वांना सोबत घेऊ. विशेषतः अशा समूहांना, ज्यांना सहसा वंचित ठेवले जाते. कारण त्यांना आपल्या नजरेतून सहसा सुटणाऱ्या गोष्टी दिसतात आणि समजतात. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे समस्या आणि उपायांबद्दलची आपली समज अधिक व्यापक करण्यासाठी, आम्ही नवीन घटकांना आणि बहुदा दुर्लक्षित राहिलेल्या घटकांना या संवादात सहभागी करून घेऊ.
  2. हवामान विषयीच्या बातम्या चिंताजनक असू शकतात. त्यामुळे आम्ही फक्त भीती निर्माण न करता, प्रत्येक कठीण विषयासोबत आशादायी माहिती देऊ, आणि सहज करता येतील असे उपाय सुचवू. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे क्लायमेट वीकमधील कार्यक्रम आणि सामग्री तयार करताना हवामानाशी संबंधित चिंता लक्षात घेतली जाईल. प्रत्येक चिंताजनक विषयासोबत आशादायी आणि कृतीस प्रोत्साहन देणारा दृष्टिकोनही दिला जाईल.
  3. आमचा संवाद फक्त क्लायमेट वीकपुरता मर्यादित नसेल, तर तो वर्षभर सुरू राहील. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे क्लायमेट वीक सर्व घटकांना सोबत घेऊन वर्षभर हवामानावरील संवाद सुरू ठेवण्यास मदत करेल.
  4. यातून आपण असं काही तयार करू, जे चिरकाल टिकेल. कार्यक्रम संपतील, पण समुदाय आणि काम सतत सुरू राहील. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे कार्यक्रमांपलीकडेही हा अनुभव आणि हे व्यासपीठ दीर्घकाळ चालू राहील याकडे आम्ही सामूहिकपणे लक्ष देऊ.
  5. आम्ही प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत समजावून सांगू. ऐकणारा कोण आहे हे पाहून, गरजेनुसार विषय सोपा करून सांगू आणि प्रश्नांचे नेहमीच स्वागत असेल. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे आम्ही सहभागी होणाऱ्या प्रेक्षकांची/लोकांची जाणीव ठेवू; विषय सोपे करून सांगण्यासाठी आणि लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नेहमी तयार राहू.
  6. आम्ही कठीण भाषा वापरणार नाही. गोंधळात टाकणारे तांत्रिक शब्द टाळू. No confusing jargon. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे आमची भाषा शक्य तितकी तांत्रिक शब्दांपासून मुक्त आणि सोपी असेल.
  7. आम्ही आमच्या नियोजनावर ठाम राहू. एकत्र मिळून ठरवलेली उद्दिष्टे, नियम आणि वचने पाळू. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम हे एकत्र मिळून तयार केलेली क्लायमेट वीक इंडिया २०२५ ची उद्दिष्टे, आचारसंहिता आणि सामुदायिक करारांनुसारच आयोजित केले जातील.
  8. उपलब्ध जागा, साहित्य आणि इतर संसाधने सर्व समुदायांना उपयोगी पडतील अशा पद्धतीने एकमेकांसोबत वाटून घेऊ. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे जागा, विक्रेते आणि साहित्य यांसारख्या संसाधनांचा वापर सर्वांना सहज करता येईल अशा सहकार्याच्या भावनेने केला जाईल.
  9. आम्ही विषयापासून भरकटणार नाही, हे हवामानासंबंधीच असेल. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे आम्ही आमचे लक्ष हवामानावरील चर्चेवरच केंद्रित ठेवू, आणि शक्य तितके मुद्द्याला धरून राहू.
  10. आम्ही समुदाय, निसर्ग आणि पर्यावरणाची काळजी घेण्यावर भर देऊ. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे संपूर्ण संवाद हा समुदाय, पर्यावरण आणि शाश्वतता या संकल्पनांभोवतीच राहील याची आम्ही खात्री करू.
  11. आम्ही कोणालाही दोष देणार नाही किंवा कमी लेखणार नाही. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे क्लायमेट वीक इंडिया २०२५ मधील संवाद आणि उपक्रम व्यक्ती किंवा गटांना लक्ष्य करून त्यांची बदनामी करण्यासाठी वापरले जाणार नाहीत.
  12. समुदाय सर्वात महत्त्वाचा असेल. हा अशा सर्वांचा उपक्रम आहे, ज्यांना पर्यावरण आणि सामाजिक न्यायाची काळजी आहे. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे क्लायमेट वीक २०२५ च्या केंद्रस्थानी समुदाय-संचालित मूल्ये आहेत. पर्यावरणासाठी कृती आणि सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध असलेल्या अनेक संस्था याचे सह-आयोजक आहेत.
  13. स्थानिक लोक नेतृत्व करतील. आपण एकत्र काम करू, सर्वांना सामावून घेऊ आणि जबाबदारी वाटून घेऊ. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे सहकार्य, सर्वसमावेशकता आणि सामायिक जबाबदारीला प्राधान्य देत आम्ही स्थानिक समुदायांना त्यांच्या गरजांनुसार उपायांचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम करू. कारण स्थानिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या गरजा काय आहेत हे अधिक स्पष्टपणे ठाऊक असते.
  14. प्रत्येकाला समान संधी मिळेल. आपले हवामानावरील उपाय हे शाश्वत, न्याय्य, सर्वांसाठी सुलभ आणि स्थानिक ज्ञानावर आधारित असले पाहिजेत. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे हा आठवडा सामूहिक कृतीची भावना बळकट करेल आणि हवामानविषयक धोरणे शाश्वत, न्याय्य, सर्वसमावेशक व स्थानिक ज्ञानावर आधारित राहतील यासाठी प्रयत्न करेल.
  15. आम्ही चर्चा करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि नवीन कल्पना आजमावण्यासाठी एक व्यासपीठ तयार करत आहोत, कारण हवामान बदलाचा ज्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होतो, त्यांनीच या मार्गाचे नेतृत्व केले पाहिजे. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे आम्ही संवाद, शिक्षण आणि नवकल्पनांसाठी एक व्यासपीठ तयार करत आहोत, ज्यामध्ये हवामान कृतीला सर्वाधिक प्रभावित लोकांचे नेतृत्व मिळावे या तत्त्वाला बळ दिले जाईल.

उद्दिष्टे

सामुदायिक करारांवर आधारित, मे २०२५ मध्ये क्लायमेट वीक इंडिया समुदायाने एकत्र येऊन ठरवलेली मुख्य उद्दिष्टे.

प्रत्येक उद्दिष्ट येथे सोप्या भाषेत दिले आहे. मूळ मजकूर वाचण्यासाठी संबंधित बाणावर क्लिक करा.

  1. आपल्या आसपास आधीपासून यशस्वी ठरत असलेल्या स्थानिक हवामान उपायांना पुढे आणूया. भारतभर अनेक लोक—विशेषतः तरुण—मर्यादित संसाधनांमध्येही हवामानासाठी उत्तम काम करत आहेत. फक्त सरकार किंवा मोठ्या कंपन्यांवर चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या कामालाही प्रकाशझोतात आणूया. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे हवामान बदलावरील स्थानिक उपायांचे प्रदर्शन आणि कौतुक करणे हवामान कृतींमधील तरुणांचे नेतृत्व आणि समुदायाच्या प्रयत्नांची दखल घेत, प्रभावी स्थानिक उपक्रम आणि नवीन उपायांना समोर आणणे.
  2. लोकांना हवामान बदल समजून घेण्यासाठी मदत करणे. केवळ व्याख्यानांद्वारे नव्हे, तर संवाद, पदभ्रमंती, चित्रपट, कार्यशाळा आणि विविध उपक्रमांद्वारे – “हवामान बदलाबद्दल ऐकलंय” इथून “माझ्या परिसरात काय घडतंय आणि मी काय करू शकतो” इथपर्यंतचा प्रवास घडवणे. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे हवामान साक्षरता आणि जनजागृती वाढवणे संवादात्मक सत्रे आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे लोकांना जोडून घेणे, ज्ञान प्रसार करणे आणि सर्वांना हवामानाबद्दल साक्षर करून माहितीपूर्ण कृतींसाठी प्रेरित करणे.
  3. ज्या लोकांचा एकमेकांशी कधीच संवाद होत नाही, त्यांना एका छताखाली आणणे. शेतकरी आणि शास्त्रज्ञ. विद्यार्थी आणि महापालिकेचे अधिकारी. कलाकार आणि अभियंते. प्रत्येकाला गोष्टीची एखादी बाजू ठाऊक असते, कोणालाच संपूर्ण गोष्ट माहीत नसते. जेव्हा या सर्व बाजू एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या कल्पना जन्माला येतात. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे विविध घटकांमध्ये संवाद आणि सहकार्याला वाव देणे विविध कौशल्ये, अनुभव, नेटवर्क आणि क्षेत्रे एकत्र आणून मुक्त संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्याने समस्या सोडवण्यास प्रोत्साहन देणे.
  4. लोकांना एकमेकांशी जोडणे आणि नंतरही संपर्क टिकवून ठेवणे. हा आठवडा संपेल, पण नातेसंबंध संपू नयेत. संस्थांमध्ये शंभर नवीन मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, हजार लोकांना एकमेकांशी जोडणे आणि कमीत कमी ५ शहरांमध्ये १० अशा लोकांना तयार करणे – जे स्थानिक पातळीवर ही व्यवस्था टिकवून ठेवतील, हे आमचे ध्येय आहे. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे धोरणात्मक सहयोग आणि सहकार्यांना चालना देणे कमीत कमी १०० नवीन संभाव्य संघटना तयार करणे आणि मजबूत करणे, ज्याद्वारे १,००० नवीन ओळखी निर्माण करणे आणि ५ शहरांमध्ये किमान १० क्लायमेट वीक ॲम्बेसेडर्सचे जाळे तयार करणे.
  5. लोकांना प्रत्यक्ष काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल असा उपक्रम घडवूयात. फक्त समस्या ऐकून वाईट वाटत घरी जाण्याऐवजी लोक यात सहभागी होऊन कृती करू शकतील. यामध्ये व्यक्ती, शाळा, व्यवसाय किंवा परिसर म्हणून तुम्हाला सहभागी होणे, निर्मिती करणे, लागवड करणे, दुरूस्ती करणे, चर्चा करणे अशा कृ़ती करता येतील. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे सार्वजनिक सहभाग आणि कृतीला सशक्त करणे नागरिक, व्यवसाय आणि संस्थांना अर्थपूर्ण उपक्रम आणि मोहिमांमध्ये समाविष्ट करून हवामान कृतींसाठी प्रेरित करणे आणि गती देणे.
  6. लोकांचे म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचवणे. या सर्व ठिकाणी आणि संवादांमधून जे काही समोर आले आहे, ते एका दस्तऐवजात लिहून ठेवा. हे नियम बनवणाऱ्यांच्या हातात द्या. जेणेकरून, ज्यांच्यावर या निर्णयांचा परिणाम होणार आहे, त्यांच्या विचारांनुसारच हे निर्णय घेतले जातील. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे धोरणात्मक प्रभावासाठी सामूहिक आवाज बुलंद करणे सहभागींचा सामूहिक आवाज दर्शवणारा एक सर्वसमावेशक अहवाल एकत्र तयार करणे, जो जानेवारी २०२६ पर्यंत निर्णयकर्त्यांसमोर सादर केला जाईल आणि भविष्यातील हवामान धोरणांना व कृतींना आकार देईल.

आचारसंहिता

आपण सर्वजण मिळून सुरक्षित आणि सन्मानित वातावरण निर्माण करतो जिथे प्रत्येकाला हवामान कृतीमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम वाटते. या मूल्यांचे पालन करून आपण क्लायमेट वीक इंडिया हा प्रत्येकासाठी सकारात्मक आणि अर्थपूर्ण अनुभव बनवतो. खाली क्लायमेट वीक इंडियासाठी समुदायाने सहनिर्मित केलेली आचारसंहिता दिली आहे.

संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी कोणत्याही शीर्षकासमोरील बाणावर क्लिक करा.

  • सर्वसाधारण आचारसंहिता क्लायमेट वीक इंडियामध्ये, आम्ही सर्व सहभागींसाठी एक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि आदरयुक्त वातावरण तयार करण्याच्या ध्येयाने एकत्र येतो. आपल्या कृतीतून सर्वांचा अनुभव ठरतोय याची आपल्याला एक समुदाय म्हणून जाणीव आहे. म्हणूनच आपण करत असलेल्या प्रत्येक कामात पुढील तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न करू.
  • सर्वसमावेशकता आणि आदर आपण एकमेकांशी सौजन्य, आदर आणि प्रतिष्ठेने वागतो. आपण आपल्या समुदायातील विविधतेचा, मग ते कोणत्याही वयोगटात, लिंग, वंश, लैंगिक ओळख, शारीरिक क्षमता, धर्म किंवा पार्श्वभूमीतील असो आपण सर्वांचा सन्मान करतो. आपल्याकडे कोणत्याही स्वरूपातील छळवणूक, दादागिरी किंवा भेदभावाला (प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन) अजिबात स्थान नाही. आपले शब्द आणि कृती ही अपमानकारक टिप्पणी, धमकावणे, अवांछित लक्ष किंवा द्वेषपूर्ण भाषणापासून मुक्त असणे हे सुरक्षित व्यासपीठाचे प्रतीक आहे. एकत्र मिळून, आपण असे वातावरण तयार करतो जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मानित वाटेल आणि तिचे म्हणणे ऐकले जाईल.
  • सुरक्षित सहभाग स्वागतार्ह वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आक्रमक किंवा धोकादायक वर्तनाला या समुदायात स्थान नाही. एखादी व्यक्ती अडचणीत असल्याचं दिसल्यास किंवा समुदायाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे वर्तन आढळल्यास, आपण कार्यक्रम आयोजकांना त्वरित कळवतो, जेणेकरून योग्य मदत मिळू शकेल. प्रत्येकाला सुरक्षितपणे सहभागी होता यावं, शिकता यावं आणि सहकार्य करता यावं हेच आपलं उद्दिष्ट आहे.
  • औपचारिक आचरण प्रामाणिकपणा आणि सचोटी हे प्रत्येक संवादाचे आधार आहेत. प्रत्येक स्थळाचे आणि सत्राचे नियम, वेळेच्या मर्यादा तसेच साहित्याविषयीच्या सूचनांचा आपण आदर करतो. आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित सर्व नियमांचे पालन करतो आणि आयोजक व स्थळ व्यवस्थापनाच्या सूचनांचे अनुसरण करतो, कारण ते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असतात.
  • पर्यावरणाची जबाबदारी हवामानाच्या मुद्द्यावर काम करणारा समुदाय म्हणून, आपण स्वतः पर्यावरणाची काळजी घेऊन इतरांसमोर आदर्श ठेवत आहोत. आपण कचरापेट्यांचा वापर करतो, कचरा कमीत कमी होईल याची दक्षता घेतो आणि शक्य तिथे शाश्वत पर्यायांची निवड करतो. आपली कृती ही या वसुंधरेप्रती असलेल्या आपल्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे.

क्लायमेट वीक इंडिया मध्ये सहभागी होऊन, आपण या सर्व मूल्यांशी सहमती दर्शवतो आणि सर्वांना एक सकारात्मक अनुभूती मिळावी यासाठी चालना देतो.