“या उपक्रमात (क्लायमेट वीक) सह-निर्मितीचा एक सुंदर भाग होता… जवळपास प्रत्येकाच्या सूचनांचे कौतुक केले गेले आणि त्या ऐकून घेतल्या गेल्या. अँकर्स देखील नवीन गोष्टी शिकण्याच्या वृत्तीने पुढाकार घेत होते, ज्यामुळे उत्तम प्रतिसाद आणि परिणाम दिसला. मी सहयोगींकडून असलेल्या पारदर्शकतेचे आणि स्पष्ट मागण्यांचे मनापासून कौतुक करतो.”
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
“देणाऱ्याने देत जावे..” (दि ओपन कबर्ड) हे सहयोगींनी सहयोगींसाठी तयार केलेलं, सामायिक संसाधनांचं दालन आहे.
ही अशी जागा आहे जिथे आपण एकमेकांना मदत करतो. हे एका मोठ्या सूचना फलकाप्रमाणे आहे असं समजा. तुम्हाला कशाची गरज असेल, तर तुम्ही मदतीची मागणी करू शकता, किंवा मग तुमच्याकडे काही देण्यासारखे असेल तर तुम्ही मदतीचा प्रस्ताव मांडू शकता.
Think of it like a big noticeboard. You can मदतीची मागणी when you need something, or मदतीचा प्रस्ताव when you have something to give.
या दालनाचा वापर पुढील प्रकारच्या गोष्टी शोधण्यासाठी होतो
- कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जागा
- वक्ते
- एकत्र काम करण्यासाठी सहयोगी
- योग्य कौशल्य किंवा ज्ञान असलेली व्यक्ती
- साहित्य आणि संसाधने
किंवा मग तुमच्यासारखेच काम करणारे इतर
तुम्हाला तुमच्या नोंदणीमध्ये बदल करायचा असेल, किंवा नोंदणी काढून टाकायची असेल, तर कृपया hope@climateweek.in या ई-मेलवर संपर्क साधा. hope@climateweek.in
या पानावर अर्ज भरण्यासाठीचा फॉर्म जोडलेला असेल. तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर आणि मॉडरेटरने तुमच्या मागणीला/प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, तुम्हाला या दालनात प्रवेश मिळेल. सर्व सहयोगींना हा फॉर्म भरता येईल.