एकाच शहरात एकच परिषद नाही; तर भारतातील विविध भाषा बोलणाऱ्या समुदायांनी देशभरात आयोजित केलेल्या शेकडो सभा, पदयात्रा, चित्रपट प्रदर्शन, स्वच्छता मोहीम आणि संवाद.
आमचा नवा लेख वाचा
जुलै २०२६: संसाधने, देवाण-घेवाण आणि वारसा
१३ जुलै रोजी संघटनेने सहयोगी दस्तऐवजाचं नाव बदलून बचावात्मक वाटणाऱ्या “MoU” ऐवजी “द कॉमन्स अॅग्रीमेंट” असं ठेवलं. हा एकच करार सर्व सहयोगी, अॅम्बेसेडर्स, स्वयंसेवक आणि अँकर्स यांच्यासाठी समान राहील.
हवामान बदल कृतीसाठी एक देशव्यापी मंच
क्लायमेट वीक इंडिया २०२६’ हा असा एक सप्ताह आहे जेव्हा संपूर्ण देश हवामान बदलाच्या मुद्द्यावर एकत्र येतो. हे आठ दिवस भारताच्या कानाकोपऱ्यातून गावांपासून महानगरांपर्यंत स्थानिक गट, शेतकरी, मासेमार, विद्यार्थी, शास्त्रज्ञ, कलाकार, व्यावसायिक आणि धोरणकर्ते एकत्र येतात, कल्पनांची देवाणघेवाण करतात, एकमेकांकडून शिकतात आणि हवामान बदलावरील ठोस उपायांना गती देतात.
हे आठ दिवस भारताच्या कानाकोपऱ्यातून गावांपासून महानगरांपर्यंत स्थानिक गट, शेतकरी, मासेमार, विद्यार्थी, शास्त्रज्ञ, कलाकार, व्यावसायिक आणि धोरणकर्ते एकत्र येतात, कल्पनांची देवाणघेवाण करतात, एकमेकांकडून शिकतात आणि हवामान बदलावरील ठोस उपायांना गती देतात.
वर्षागणिक याचा विस्तार वाढत आहे. क्लायमेट वीक इंडिया कोणत्याही एका कार्यालयातून किंवा एका संस्थेद्वारे चालवले जात नाही. हे मोठ्या शहरांपासून लहान गावांपर्यंत आणि डिजीटल पद्धतीने देखील आयोजित केले जाते. स्वतःच्या भागात आधीपासूनच हे काम करत असलेल्या लोकांकडून याचे नेतृत्व केले जाते. यामध्ये तुमच्यासाठीही एक स्थान आहे.
यामध्ये तुमच्यासाठीही एक स्थान आहे.
“…नवीन काहीतरी सुरू करण्याऐवजी, सध्या जे काम सुरू आहे त्याला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून हे व्यासपीठ कसं वापरता येईल? तरुण पिढी, जमिनीवर प्रत्यक्ष काम करणारे नागरिक स्वतःच या मंचाचे नेतृत्व करतील. ते ज्या समस्यांना तोंड देत आहेत आणि त्यावर काय उपाय शोधत आहेत यावर संवाद साधतील, अशी माझी कल्पना आहे.”
समुदायाचा मूलभूत विचार
क्लायमेट वीक इंडिया संघटनेने घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे सामुदायिक करार (कम्युनिटी अग्रीमेंट्स) हीच मार्गदर्शक तत्त्वे असतात. या करारांशी सहमती असलेली कोणतीही संस्था किंवा व्यक्ती या उपक्रमाचा भाग बनू शकते.
आमची उद्दिष्टे देखील या सामुदायिक करारांवर आधारित आहेत.
सामुदायिक करार आणि उद्दिष्टांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी “आमच्याविषयी” या पानाला भेट द्या. हे सर्व समुदायाच्या सहभागातून कसे विकसित झाले, ते आमच्या ब्लॉगमध्ये वाचा. सामुदायिक करार (कम्युनिटी अग्रीमेंट्स) उद्दिष्टे आमच्याविषयी ब्लॉग
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
क्लायमेट वीक इंडियामध्ये कोण सहभागी होऊ शकते?
कोणीही! क्लायमेट वीक इंडिया मध्ये शेतकरी, विद्यार्थी, मासेमार, धोरणकर्ते, संशोधक, सामाजिक संस्था, व्यावसायिक, तरुण आणि स्थानिक/आदिवासी समुदाय – तुम्ही कार्यक्रमात सहभागी होत असाल, कार्यक्रमाचं आयोजन करत असाल किंवा फक्त माहिती पसरवत असाल- सगळ्यांचेच सहर्ष स्वागत आहे.
सहभागी होण्यासाठी भारतात असणे आवश्यक आहे का?
नाही. बहुतेक कार्यक्रम भारतातील शहरांमध्ये आणि गावांमध्ये होत असतात. मात्र, अनेक सत्रे ऑनलाइन देखील आयोजित केली जातात आणि जगभरातून कोणीही त्यात सहभागी होऊ शकते.
क्लायमेट वीक दरम्यान मी कार्यक्रमाचे आयोजन कसे करू शकतो/शकते?
सोलिडॅरिटी आणि कोअर पार्टनर्सना कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. सहयोगाच्या स्वरूपांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि तुमची उत्सुकता नोंदवण्यासाठी ‘सहभागी व्हा’ या पानाला भेट द्या.
कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी काही शुल्क आहे का?
क्लायमेट वीक इंडियाचे बहुतेक कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वांसाठी खुले असतात. तरीही काही सहयोगींनी आयोजित केलेल्या सत्रांसाठी मर्यादित जागा किंवा नोंदणी आवश्यक असू शकते.
संपूर्ण कार्यक्रम वेळापत्रक कुठे पाहता येईल?
आमच्या ‘कार्यक्रम’ या पानावरील लाईव्ह कॅलेंडर पहा, किंवा तुमच्या शहराजवळील कार्यक्रम शोधण्यासाठी ‘ठिकाणे आणि पोहोच’ हे पान तपासा.